राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:34+5:302020-12-05T04:55:34+5:30
कोल्हापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यातील उमेदवारांना विविध खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ...

राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यातील उमेदवारांना विविध खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात दि. १२ व १३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये राज्यातील अनेक खासगी उद्योजकांचा सहभाग असणार आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्यांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा, असे आवाहनही सहायक आयुक्त माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३१/२५४५६७७0 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.