सरवडेत १२ जानेवारी ते १० मार्चअखेर सावित्री उत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:20+5:302021-01-08T05:18:20+5:30

सरवडे : अंगणवाडी क्रमांक २६४ मध्ये अनुभव शिक्षण केंद्र कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी ...

Organizing Savitri festival in Sarvad from 12th January to 10th March | सरवडेत १२ जानेवारी ते १० मार्चअखेर सावित्री उत्सवाचे आयोजन

सरवडेत १२ जानेवारी ते १० मार्चअखेर सावित्री उत्सवाचे आयोजन

सरवडे : अंगणवाडी क्रमांक २६४ मध्ये अनुभव शिक्षण केंद्र कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी ते १० मार्चअखेर सावित्री उत्सवाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा समन्वयक शिवाजी माळी व शिक्षिका सुनीता पाटील यांनी दिली

या उपक्रमासंबंधी माहिती देताना माळी म्हणाले, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आहे. त्या दिवशी खुल्या रांगोळी स्पर्धा, ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृतिदिन आहे. त्यादिवशी किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रबोधन रॅली, १६ फेब्रुवारीस संत गाडगेबाबा जयंती यादिवशी सामान्यज्ञान स्पर्धा, १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती या दिवशी बालस्नेही वाचनालयाचे उद्घाटन, ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी खुल्या चित्रकला स्पर्धा, तर १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिन असून त्यादिवशी किशोरवयीन मुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण केंद्राचे समन्वयक माळी यांनी केले आहे.

Web Title: Organizing Savitri festival in Sarvad from 12th January to 10th March