सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:50+5:302021-02-05T07:05:50+5:30

शिरोळ : शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी कसा होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन ...

Organic matter is the soul of the soil | सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा

सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा

शिरोळ : शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी कसा होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन वाढ होऊ शकेल. सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे. त्यामुळे मातीची काळजी घेणे गरजेचे बनले आहे, असे मत कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अरुण मराठे यांनी व्यक्त केले.

श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून उमळवाड (ता. शिरोळ) येथे ऊस पीक चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब मगदूम होते. प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मराठे म्हणाले, जमिनीची सुपीकता, उत्पादकता व ऊस उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती करून घेणे आवश्यक आहे. मातीवर शेती अवलंबून आहे. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब घटक असणे ही अत्यावश्यक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी श्रीशैल हेगाण्णा, दिलीप जाधव, ए. एस. पाटील, पप्पू चौगुले, ऋषभ पाटील, बाळासाहेब कोळी, दिलीप गुरव, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - उमळवाड (ता. शिरोळ) येथे शेतकरी मेळाव्यात अरुण मराठे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Organic matter is the soul of the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.