कोल्हापूर : राजारामपुरी बस रूटवरील निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कबाबत तक्रारी आल्यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे निदर्शनास येताच ठेकेदाराला नोटीस बजावण्याच्या तसेच उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ अभियंता यांनाही कारणे दाखवा नोटिसा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संबंधित ठेकेदाराची देयके थांबविण्याचे निर्देशही देण्यात आले. दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना उप-शहर अभियंत्यांना देण्यात आल्या.महानगरपालिका प्रशासनाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या डांबरी प्लांटमधून मिळालेल्या प्रिमिक्स डांबराचा वापर शहरातील पॅचवर्कसाठी सुरू झाला आहे. या प्रिमिक्सद्वारे ताराबाई पार्क ते दाभोळकर कॉर्नर दरम्यानच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरी पॅचवर्कच्या कामाची सोमवारी सकाळी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली.मध्यवर्ती बसस्थानक, परिख पूल, रेल्वे फाटक या मार्गावरील सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी पाणी पुरवठा, ड्रेनेज तसेच विद्युत विभागाने क्रॉसिंगदरम्यान दैनंदिन समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. परिख पूल परिसरातील युटिलिटी कामादरम्यान कोणतेही लिकेज असल्यास ते तातडीने दूर करण्याच्या सूचना जल अभियंता, शाखा अभियंता व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. परिख पूल येथील एका बाजूचे काम तातडीने पूर्ण करून उर्वरित दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याबाबत संबंधित ठेकेदारास सूचना दिल्या.यावेळी सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, मीरा नगीमे, सर्व्हेअर अर्जुन कावळे उपस्थित होते.महापालिका डांबर, खडी खरेदी करणाररस्ते पॅचवर्क कामे गतीने होण्यासाठी महापालिकेने भाडेतत्त्वावर प्लॅन्ट भाड्याने घेतला आहे. प्लॅन्टवर ठेकेदाराकडून खडी घेण्यात येत आहे. तसेच प्लॅन्टसाठी लागणारे डांबर महापालिका स्वत: डायरेक्ट कंपनीकडून खरेदी करत असून, महापालिकेची सर्व यंत्रणा व कर्मचाऱ्यांमार्फत या रस्ते पॅचवर्कची कामे सुरू करण्यात आली आहेत.
Web Summary : Kolhapur administrator halted payment for substandard roadwork after inspection. Notices issued to contractor and engineers. Municipality to purchase materials for faster repairs.
Web Summary : कोल्हापुर प्रशासक ने निरीक्षण के बाद घटिया सड़क कार्य का भुगतान रोका। ठेकेदार और इंजीनियरों को नोटिस जारी। नगरपालिका तेजी से मरम्मत के लिए सामग्री खरीदेगी।