शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 11:48 IST

टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या परिक्षेत्रातील संशयित खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. बहुतांश सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची विशेष पथकांकडून चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची माहितीकोल्हापूर जिल्ह्यातील ३५ सावकार रडारवर : ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा बडगा

कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या परिक्षेत्रातील संशयित खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. बहुतांश सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची विशेष पथकांकडून चौकशी सुरू आहे.

संशयित सावकारांवर संघटित गुन्हेगारी ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त सावकारांवर पोलिसांची नजर असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंगळवारी दिली.अवैध व्यावसायिकांसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा जास्त टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांचा सुपडासाफ करण्याचे धोरण पोलीस प्रशासनाने अवलंबिले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. जिल्ह्यात सावकारांकडून ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे सावकार वसुलीसाठी तगादा किंवा दमदाटी करीत असतील तर नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा.

सावकारांच्या धमकीला बळी पडू नये. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील संशयित सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची चौकशी सुरू असून घरांवर छापे टाकण्याचे आदेश दिले आहेत. करोडो रुपयांची माया मिळविणाऱ्या खासगी सावकारांवर ‘मोक्का’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढापोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, टोळ्यांवर कठोर कारवाई करा. दहशत करून कुळे काढणाऱ्या गुन्हेगारांचा बीमोड करा, असे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती डॉ. वारके यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर