पंचगंगा हॉस्पिटलमधील औषधांच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: June 9, 2016 01:24 IST2016-06-09T00:29:06+5:302016-06-09T01:24:43+5:30
‘स्थायी’ सभापतींची अचानक भेट : आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

पंचगंगा हॉस्पिटलमधील औषधांच्या चौकशीचे आदेश
संजय तिपाले , बीड
जिल्ह्यात दारुबंदीचे वारे जोरजोरात वाहू लागले आहे. बाटली आडवी करण्यासाठी पदर खोचून उभ्या झालेल्या महिलांनी माजलगाव व पाटोदा येथे थेट दारुविक्रेत्यांच्या घरावर छापे टाकून पकडलेल्या बाटल्या पोलिसांच्या समोर ठेवल्या. त्यामुळे रणरागिणींच्या संतापाचा उद्रेक तर दिसलाच शिवाय पोलिसांची निष्क्रियताही लपून राहिली नाही. आता स्थिती अशी आहे की, अवैध विक्रेत्यांनी पोलिसांऐवजी महिलांचीच जास्त धास्ती घेतली आहे.
परळी तालुक्यातील धारावती तांडा, पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे वर्षभरापासून तर माजलगाव तालुक्यातील लऊळ येथे तीन महिन्यांपासून अवैध दारुविक्रीविरोधात लढा सुरू आहे. दारुमुळे होणारे भांडण - तंटे, उद्धवस्थ झालेले संसार व कुटुंबाची वाताहत या महिलांनी जवळून पाहिली. त्यामुळे घरातल्यांपासून ते दारातल्यापर्यंत सर्वांचा विरोध पत्कारुन काही महिला दारुबंदीसाठी पुढे आल्या. पोलीस ठाण्यांपासून ते उत्पादन शुल्क कार्यालय व महानिरीक्षकांपर्यंत उंबरठे झिजवले; परंतु रणरागिणींच्या पदरी निराशाच पडली. विके्रत्यांची नावासह यादी पोलिसांकडे देऊनही दारुविक्री बंद होत नाही म्हणून दोन दिवसांपूर्वी सौताडा (ता. पाटोदा) येथे सीता सानप व लऊळ (ता. माजलगाव) येथे सत्यभामा सौंदरमल, दीपाली पाटील यांनी थेट दारुविक्रेत्यांच्या घरांवर धडक दिली. लऊळमध्ये सौंदरमल व पाटील या दोघींनी दारुच्या बाटल्यांचा पुरावा घेऊन ग्रामीण ठाणे गाठले.
सौताड्यात सीता सानप यांनी विके्रत्याला इतर महिलांच्या मदतीने पकडून पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दोन्ही ठिकाणची पोलीस यंत्रणा कामाला लागली. सर्वसामान्य महिलांना दारु सापडते; परंतु कायद्याचे कवच, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असे सारे अस्त्र हातात असताना पोलिसांना ती सापडत नाही. रणरागिणनी बंडाच्या पावित्र्यात असताना कायद्याचे रक्षक थंड कसे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
मागील ५० वर्षांच्या कालावधीत केवळ दोनच गावांत दारुबंदी होऊ शकली. बीड तालुक्यातील काळेगाव येथे राहीबाई धुमाळ या सत्तरीतील महिलेने २००९ मध्ये दारुची बाटली आडवी करुन अनेकांचे संसार वाचविले.
४त्यानंतर केज तालुक्यातील आडस येथे २०११ मध्ये दारुबंदीचा लढा महिलांनी जिंकला होता. आता गावाबाहेरून विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. दारूबंदीच्या बाजूने एकूण मतदारांपैकी ५० टक्के कौल हवा असतो.
४काही गावांत राजकीय मंडळींचा विक्रेत्यांना वरदहस्त असतो. प्रशासन दरबारी पाठपुरावा करताना महिलांचीही दमछाक होते. त्यामुळे दारूबंदी होण्यास अडचणी येतात.
परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे वर्षभरापासून अंगणवाडी सेविका शांताबाई राठोड व पारुबाई चव्हाण या दारुबंदीची मागणी करत आहेत. २६ मे रोजी विशेष पोलिीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी कैफियत मांडली होती. त्यानंतर आठ दिवसांत दारु हद्दपार केली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले होते; परंतु चोरीछुपे दारुअड्डे सुरुच आहेत. शांताबाई राठोड यांनी कित्येकदा दारुअड्डे उद्ध्वस्थ केले. रसायन, दारुचे बॅरेल उलथवून टाकले. अधीक्षक अनिल पारसकर यांनी तांड्यावर राहुटी देऊन तीन पोलीस कायमस्वरुपी नेमले; पण अद्यापही दारुविक्री थांबलेली नाही.