कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश

By Admin | Updated: June 4, 2017 15:13 IST2017-06-04T15:13:16+5:302017-06-04T15:13:16+5:30

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

Order in Kolhapur District | कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : कोल्हापूरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी रविवारपासून १७ जूनपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केले आहे.
शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन सातबाराकोरा करावा, शेती मालास योग्य हमी भाव मिळावा यासह इतर मागण्याकरीता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी १ जूनपासून पुकारलेले राज्यव्यापी शेतकरी आंदोलन, मराठा महासंघ व इतर मराठा संघटनेकडून मराठा आरक्षणा संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होणारी आंदोलने, दौलत साखर कारखाना लि.हलकर्र्णी येथील कामगारांचा थकीत पगार व भत्ते तात्काळ मिळावे सुरु असलेले धरणे आंदोलन इत्यादी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी रविवारपासून १७ जूनपर्यंत जिल्ह्यात हे बंदी आदेश लागू केले आहे.

Web Title: Order in Kolhapur District