शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

चाईल्डलाईनकडील गंभीर प्रकरणांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 15:52 IST

पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. हृषिकेश यशोद यांनी दिले.

ठळक मुद्देचाईल्डलाईनकडील गंभीर प्रकरणांच्या चौकशीचे आदेशमहिला व बालविकास आयुक्त : विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. हृषिकेश यशोद यांनी दिले.कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना त्यासंबंधीचे पत्र त्यांनी दिले असल्याने ही चौकशी आता पोलीस खात्यातर्फेच होणार आहे.लोकमतने या संदर्भातील वृत्त ८ ऑगस्टला दिले होते.या गैरप्रकाराबद्दल संस्थेतील माजी कर्मचाऱ्यांनी निनावी तक्रार केली आहे. त्याचा आधार घेऊन अन्य एका संस्थेने तीन महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी लेखी मागणी ५ ऑगस्टला चाईल्डलाईन इंडिया फौंडेशनसह महिला व बालविकास आयुक्त, जिल्हाधिकारी व बालकल्याण समितीकडे केली होती. चाईल्डलाईन संस्थेचे कोल्हापूर केंद्र सांगली मिशन सोसायटीतर्फे चालविले जाते.पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील मुलीचा मेमध्ये बालविवाह करण्यात येणार असल्याचे चाईल्डलाईनला समजले. या प्रकरणात कर्मचाऱ्याने ५० हजार रुपये व बांधकामासाठी एक वाळूचा ट्रक घेतला. या मुलीचे लग्न झाले असून सध्या ती पाच महिन्यांची गरोदर आहे.

कोल्हापुरातील आर.के.नगरजवळ असलेल्या गावातील बाललैंगिक अपराध नोंद (पोक्सो) प्रकरणात एका मॅडममार्फत आर्थिक व्यवहार झाला आहे. भीक मागणाऱ्या मुलांना पकडले जाते. तुमची केस बालकल्याण समितीसमोर नेत नाही, असे लिहून घेऊन भीक मागितलेले पैसेही कर्मचारी काढून घेतात, असे तक्रारींचे स्वरूप आहे.

चाईल्डलाईन कोल्हापूर संस्थेकडून बालकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. बालविवाहास प्रोत्साहन दिले जात आहे. बाललैंगिक अपराध प्रकरणे उघडकीस येऊ नयेत, यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे तक्रारीवरून दिसते. हे आक्षेप गंभीर व अपराधिक स्वरूपाचे असल्याने त्याची तातडीने चौकशी करावी.- डॉ. हृषिकेश यशोदआयुक्त,महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य

चक्क सरकारी रुग्णालयातच गर्भपातनागाळा पार्कमधील १४ वर्षांच्या मुलीवर शेजारच्या डॉक्टरने अतिप्रसंग केला. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी संबंधित डॉक्टरकडून दोन लाख रुपये घेण्यात आले. गर्भवती मुलीचा लाईन बझारमधील सर्वोपचार केंद्रात शस्त्रक्रिया करून गर्भ काढून टाकण्यात आल्याची तक्रार आहे.

हे रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे आहे. त्यामुळे तिथे असा प्रकार घडला असेल तर ते अधिकच गंभीर आहे. तक्रार होऊनही रुग्णालयाच्या प्रशासनाकडून याबाबत काहीच स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.प्रकरण धसास लागणारज्या प्रकरणाची महिला व बालविकास आयुक्तांनी दखल घेतली, त्या प्रकरणात जिल्हा बालकल्याण समितीने आतापर्यंत फक्त संबंधित संस्थेला नोटीस बजावली आहे. आता ही चौकशी पोलिसांमार्फत होणार असल्याने त्यातील नेमके तथ्य बाहेर येण्यास मदत होऊ शकेल.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर