शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

जिल्हा बॅँकेला अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:16 IST

अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेला अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्या: बाबगोंड पाटील यांच्या शिष्टमंडळाची मागणी : विभागीय उपनिबंधकांना निवेदन

कोल्हापूर : अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या निवेदनाची प्रत न्यू शाहूपुरी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक कृष्णा ठाकरे यांनाही देण्यात आली. सन २००७ व २००८ साली केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले आहे. देशभरातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळाला; परंतु जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे हे सर्व शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत.

यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावे दाखल केले. या दाव्यांपैकी फेरयाचिकेची सुनावणी होऊन न्यायालयाने दाव्यातील सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवीत त्यांचा कर्जपुरवठा सुरू करावा, असा महत्त्वपूर्ण निकाल ३० जानेवारी २०१७ ला दिला. या आदेशाविरुद्ध ‘नाबार्ड’ने सर्वाेच्च न्यायालयात दावा दाखल केला.

याची सुनावणी २८आॅगस्ट २०१७ रोजी होऊन मूळ दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम १० लाख रुपये इतकी आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असा अंतरिम आदेश दिला आहे.

हा आदेश होऊन आठ महिने झाले तरी जिल्हा बॅँकेने सदर शेतकऱ्यांना अजूनही कर्जपुरवठा सुरू केलेला नाही. जिल्हा बॅँक प्रशासनाला निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बॅँकेला कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा सनदशीर मार्गाने जनआंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.शिष्टमंडळात यशवंत संकपाळ, लक्ष्मण व्हन्नुरे, कुतबुद्दीन नदाफ यांच्यासह शेतकºयांचा समावेश होता.

नाव ‘नाबार्ड’चं अन् स्वार्थ निवडणुकीचानाबार्ड पतपुरवठा करू देत नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे कारण सांगणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पतपुरवठा करून निवडणुकीचा स्वार्थ साधायचा आहे, असा टोला जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता बाबगोंड पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर