शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

पहिली ते आठवीच्या निकालासाठी ‘आकारिक’चा पर्याय ; शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:31 IST

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भारांशाप्रमाणे होते.

ठळक मुद्देमूल्यमापनाचा प्रश्न सुटणार

संतोष मिठारीकोल्हापूर : परीक्षा रद्द केल्याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल कशा पद्धतीने तयार करायचा, हा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘आकारिक मूल्यमापना’चा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. त्याबाबत शालेय शिक्षण विभागाने विचार करणे आवश्यक आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भारांशाप्रमाणे होते. दि. २० आॅगस्ट २०१० रोजीच्या शासन आदेशानुसार सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून या पद्धतीने मूल्यमापनाची कार्यवाही दरवर्षी केली जाते. शैक्षणिक वर्षात सत्र एक आणि दोनचे मूल्यमापन केले जाते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द केली आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांना सत्र दोनचा अंतिम निकाल, मूल्यमापन कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने आकारिक मूल्यमापनावर आधारित अंतिम निकाल सरासरी पद्धतीने तयार करण्याचा पर्याय मांडला आहे. त्याबाबतचे निवेदन राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाची शिक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.सरासरी पद्धतीने असा लावता येईल निकाल (उदाहरण)इयत्ता आकारिक गुण सरासरी सूत्र सरासरी १०० पैकी गुण श्रेणीइयत्ता पहिली, दुसरी ७० पैकी प्राप्त गुण ६५ ६५ गुणिले १०० भागिले ७० ९२ अ-१तिसरी, चौथी ६० पैकी ५० ५० गुणिले १०० भागिले ६० ८३ अ-२पाचवी, सहावी ५० पैकी ४५ ४५ गुणिले १०० भागिले ५० ९० अ-२सातवी, आठवी ४० पैकी ३५ ३५ गुणिले १०० भागिले ४० ८७ अ-२

आकारिक मूल्यमापन म्हणजे?दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाऱ्या मूल्यमापनाला आकारिक म्हटले जाते. सर्व शाळांतील पहिल्या सत्रातील आकारिक, संकलित मूल्यमापन पूर्ण झाले आहे. 

सध्या सर्व शाळांनी आकारिक मूल्यमापन पूर्ण केले आहे. त्यामुळे या मूल्यमापनाच्या गुणावर सरासरी गुण काढून सत्र दोनचा निकाल लवकर जाहीर करता येईल. त्याचा शिक्षण विभागाने विचार करावा.-संतोष आयरे, उपाध्यक्ष, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक