स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

By Admin | Updated: October 23, 2016 01:08 IST2016-10-23T01:05:57+5:302016-10-23T01:08:32+5:30

मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार : शासकीय पदभरती व इतर भरतीच्या अघोषित बंदीविरोधात ७ नोव्हेंबरला आंदोलन

Opposition candidates will take a march on the District Collector's office | स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

कोल्हापूर : शासकीय पदभरती व इतर भरतीच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारी मोर्चा काढला. स्पर्धा परीक्षा युवक संघर्ष समितीतर्फे आणि अखिल भारतीय नौजवान सभेच्या सहकार्याने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा, तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय यावेळी झाला.
जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायबर चौक येथून सकाळी अकरा वाजता एकत्र येऊन हा मोर्चा काढला. माउली चौकमार्गे सम्राटनगर येथील हुतात्मा पार्क येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला़ शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे़ सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़
मोर्चात राज्य निमंत्रक गिरीश फोंडे, सचिन लोंढे-पाटील, दत्तात्रय कोळेकर, सूरज चौगुले, स्वप्निल पोवार, प्रशांत अंबी, विनायक अलकुंटे, अनिकेत पाटील, सुनील डोंगळे, अनिल वाघमोरे, चेतन मस्के, रोहित इंदुलकर, प्रमोद पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)



प्रमुख मागण्या....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील अधिकारी पदांमध्ये करण्यात आलेली कपात मागे घ्या.
या परीक्षा पूर्व, मुख्य, मुलाखत या सर्व एक वर्षाच्या कालावधीत निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात याव्यात.
सर्व स्पर्धा परीक्षांमधील पदभरतीकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात येऊन त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी.
नोकऱ्या न मिळालेल्या युवकांना बेरोजगार भत्ता द्यावा.
पूर्वपरीक्षा अथवा प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निवड होईपर्यंत विद्यावेतन द्यावे.
शिक्षण विभाग, विद्यापीठे यांमधील जागा त्वरित भराव्यात.

मोर्चामध्ये कोणीही नेता नाही
विद्यार्थ्यांचा हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाला होता. विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व कोणाही एकाने केले नाही़ आमच्या मोर्चामध्ये कोणीही नेता नाही. आम्ही सर्वजण हक्कांसाठी एकत्र आलो आहेत, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर होत नाही़ वेळापत्रक जाहीर झालेच, तर पदसंख्येत मोठी कपात करण्यात येते़ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी मोर्चा काढला आहे.
- संभाजी पाटील
——————————————

Web Title: Opposition candidates will take a march on the District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.