शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा  : सुराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:17 IST

कोल्हापूर : देशात दुफळी माजवणाऱ्या नागरिकत्व कायद्याला जनतेने कडाडून विरोध करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी रविवारी कोल्हापुरात ...

ठळक मुद्देदेशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा पन्नालाल सुराणा यांचे आवाहन : सोशालिस्ट पार्टीचे कोल्हापुरात अधिवेशन

कोल्हापूर : देशात दुफळी माजवणाऱ्या नागरिकत्व कायद्याला जनतेने कडाडून विरोध करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी रविवारी कोल्हापुरात केले.सोशालिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याचे पाचवे द्वैवार्षिक अधिवेशन कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठात आयोजित करण्यात आले होते. सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष हसन देसाई होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, माजी आमदार जे. यू. नाना ठाकरे, स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने, मिरासाहेब मगदूम, वर्षा गुप्ता, एम. एस. पाटोळे, बाबा मगदूम, नेमिनाथ सिदनाळे, जगन्नाथ कांदळकर, ललिता सबनीस, अशोक चौगुले हेदेखील उपस्थित होते.केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीरविषयक नीतीचा व दडपशाहीचा निषेध करून सुराणा यांनी बहुमताच्या जोरावर अशा प्रकारचे कायदे लादणे चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी सबनीस यांनीही समाजवादाचे ध्येय कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे; पण सध्यस्थितीत संवादाच्या जागा प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. समाजवादी नेत्यांनी स्वत:मध्ये बदल करून बेरजेचे राजकारण करावे, असे आवाहन केले.

नागरिकत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजप व त्यांच्या नेत्यांचा निषेध केला. स्वागत व प्रास्ताविक अधिवेशनाचे अध्यक्ष हसन देसाई यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब टोणे यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कांदळकर यांनी मानले. या अधिवेशनाला सोशालिस्ट पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.१) पन्नास पैशाचे पोस्ट कार्ड चालू ठेवा.२) देशात दुफळी माजविण्याचे दुष्टकर्म थांबवा.३) शेतकरी, बेरोजगार तरुण, मागास विद्यार्थी यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवा.४) सर्व राज्यकारभार मराठीतून चालवावा.५) बंद केलेल्या मराठी प्राथमिक शाळा चालू कराव्यात.६) पूरबाधित अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार साहाय्य दोन महिन्यांत द्यावे.७) मागास जातीजमातीचे विद्यार्थी आश्रम शाळा, बालगृहांचे थकीत अनुदान द्यावे.८) रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी खास प्रयत्न करावेत.

 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर