शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

Kolhapur: राजकीय आखाड्यातील विरोधक एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 16:20 IST

आमदार ऋतुराज, कृष्णराज जवळजवळ

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त येथील खासबाग मैदानात रविवारी आयोजित कुस्ती मैदानात राजकीय आखाड्यात एकमेकांचे विरोधक असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले होते; मात्र ते व्यासपीठावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. संभाजीराजे छत्रपती हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांचे समर्थक मिशन २०२४ असे फलक हातात घेऊन आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीसंबंधी काही राजकीय भाष्य होईल, असा अंदाज होता; मात्र व्यासपीठावरील वक्त्यांनी कुस्तीवर अधिक बोलणे पसंत केले. संभाजीराजे छत्रपती यांनीही कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खासबाग मैदानात करण्याची घोषणा आपल्या भाषणात केली.व्यासपीठावर शाहू छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी आमदार मालोजी छत्रपती, माजी आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये एकमेकांचे विरोधक चंद्रदीप नरके एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पी. एन. पाटील बसले होते. खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर मात्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते. मैदानात कुस्ती लावताना आणि बक्षीस वितरणावेळीही एकत्र आले नाहीत. यावेळी माजी पालकमंत्री केसरकर यांचेही भाषण झाले.

गोकुळतर्फे भव्य कुस्ती मैदानमाजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लवकरच गोकुळतर्फे भव्य कुस्त्यांचे मैदान भरवले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली. यावेळी एक नको, दोन, तीन घ्या, तारीख आताच जाहीर करा, अशी मागणी आर. के. पोवार यांनी केली. यावर मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीमुळे मध्ये दोन, तीन महिन्याचा ब्रेक लागणार आहे. लोकसभा, विधानसभा तुम्हाला लढवायची आहे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

आमदार ऋतुराज, कृष्णराज जवळजवळएकमेकांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज व्यासपीठावर जवळजवळ खुर्चीवर बसले होते; मात्र आमदार सतेज पाटील हे व्यासपीठावर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला खासदार महाडिक बसले होते.

३५० वस्तादांचा सत्कारकुस्ती आयोजन समितीतर्फे जिल्ह्यातील ३५० वस्तादांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यामुळे खासबाग मैदान फेटे आणि भगवे ध्वजमय झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण