होनगानजीक २० लाखांचे अफीम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:09+5:302021-02-20T05:10:09+5:30

बेळगाव : होनगानजीक एका पान शॉपवर छापा टाकून सीईएन पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतीचे १ किलो १५ ग्रॅम ...

Opium worth Rs 20 lakh seized near Hong | होनगानजीक २० लाखांचे अफीम जप्त

होनगानजीक २० लाखांचे अफीम जप्त

बेळगाव : होनगानजीक एका पान शॉपवर छापा टाकून सीईएन पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतीचे १ किलो १५ ग्रॅम अफीम अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कमलेश सुरजनराम बेनीवाला (वय २५, रा. स्टील ग्रील फॅब्रिकेशन गोकुळ रोड, मोरारजीनगर, हुबळी) सावनराम आसाराम बिष्णोई (२१, रा. चन्नम्मानगर, बेळगाव) आणि बरकतखान यल्लाखान (३०, रा. वृत्ती पान शॉप, राजस्थान धाबा, जोगणहट्टी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

होनगाजवळील एका पान शॉपमध्ये अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर सीसीबीआयचे अधिकारी बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील खास पथकाने छापा टाकून पान दुकानात दडवलेले १ किलो १५ ग्रॅम अफीम जप्त केले. परराज्यातून अफीम आणून त्याची बेळगाव परिसरात विक्री केली जात होती.

Web Title: Opium worth Rs 20 lakh seized near Hong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.