शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विमा नसणाऱ्या वाहनांवर आता कारवाई, परवान्यासह होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:34 IST

बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार या घटनेची गांभीर्याने दखल आता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. विमा पॉलिसी नसणारी वाहने रस्त्यावर फिरताना मिळून आल्यास ती जप्त केली जाणार आहेत.

ठळक मुद्देविमा नसणाऱ्या वाहनांवर आता कारवाई, परवान्यासह पॉलिसीची होणार तपासणीचालकास ३००, तर वाहन मालकास दोन हजारांचा होणार दंड

कोल्हापूर : बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार या घटनेची गांभीर्याने दखल आता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. विमा पॉलिसी नसणारी वाहने रस्त्यावर फिरताना मिळून आल्यास ती जप्त केली जाणार आहेत.दुचाकी अथवा सर्वच प्रकारच्या वाहनांना विमा पॉलिसी बंधनकारक आहे. वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्यास समोरच्या व्यक्तीला नुकसानभरपाई, थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळावा, अशी अपेक्षा असते. काही चारचाकी वाहनधारक विमा पॉलिसीची मुदत संपली तरीही वाहने फिरवत असतात. अशा वाहनांचे अपघात झाल्यास संबधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई मिळत नाही.

मृत व्यक्तीवर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असेल, तर खूपच अडचणी येतात. त्यामुळे विमा नसलेली वाहने रस्त्यावर येऊ नयेत. यासाठी शासनाने आता वाहनचालक परवाना, वाहनाची कागदपत्रे, यांसह आता संबंधित वाहनाचा थर्ड पार्टीसह फुल्ल विमा उतरविण्याचे बंधन केले आहे. विम्याची पावती जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

जे वाहन विमा घेत नाही, ते रस्त्यावर फिरताना आढळल्यास चालकास ३०० रुपये व मालकास दोन हजार रुपये दंड होणार आहे. वेळप्रसंगी वाहन जप्त केले जाणार आहे. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा विमा उतरवून त्याची कागदपत्रेवाहनात ठेवण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर