अंधांच्या संकेतस्थळाचे पुण्यात उदघाटन
By Admin | Updated: January 19, 2015 23:59 IST2015-01-19T23:58:16+5:302015-01-19T23:59:48+5:30
कॉन्फरन्सद्वारे सहभाग : डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून निर्मिती

अंधांच्या संकेतस्थळाचे पुण्यात उदघाटन
कसबा बावडा : अंधांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी अंधशिक्षक संशोधक सतीश नवले यांनी सुरू केलेल्या ६६६.स्रांु.्रल्ल या संकेतस्थळाचे उद्घाटन आज, सोमवारी पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये ले. जन. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते व पुण्यातील ‘प्रेरणा’ या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अरविंद कणेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही याचवेळी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे या संकेतस्थळाचे उदघाटन झाले.
दरम्यान, याचवेळी हे संकेतस्थळ तयार करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या उद्घाटन सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला.
यावेळी सतीश नवले म्हणाले, अंधासाठी तयार करण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. लवकरच रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील प्रेरणा आणि डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी श्रीधर पाटील, सौरभ रेडेकर, गजानन कुंभार, धीरज शेटे, स्वप्निल कांबळे यांच्या सहकार्यातून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा अंधांना चांगलाच फायदा होणार आहे. अंधांसाठी जनजागृती अभियान, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे आदींसाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.
यावेळी प्राचार्य विजय घोरपडे तसेच मिलिंद पांगिरे, आप्पा जाधव, हणमंत जोशी, उपप्राचार्या क्षमा कुलहल्ली उपस्थित होते.