११ नोव्हेंबरपासून मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा

By Admin | Updated: October 15, 2014 00:29 IST2014-10-15T00:17:25+5:302014-10-15T00:29:07+5:30

विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एस. एस. चौगुले

Open University's Supplementary Examination from 11th November | ११ नोव्हेंबरपासून मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा

११ नोव्हेंबरपासून मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या चालू वर्षातील पुरवणी (रिपीटर) परीक्षा ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, त्या २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. यामध्ये बी.ए./बी.कॉम (मराठी/इंग्रजी), बी.ए.(पोलीस प्रशासन/हिंदी/ऊर्दू/ग्राहक सेवा), बी.बी.ए., बी.लिब., बी.एड्., एम.एड्. , एम.ए.(शिक्षणशास्त्र) एम.एस.डब्लू., एम.ए.(मराठी), एम.बी.ए., एम.लिब., इत्यादी अभ्यासक्रमांंचा समावेश आहे. कोल्हापूर विभागीय केंद्राअंतर्गत महावीर महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज (कोल्हापूर), कन्या महाविद्यालय (मिरज), वराडकर बेलोसे महाविद्यालय (दापोली), डी. बी. जे. कॉलेज (चिपळूण), नवनिर्माण कॉलेज (रत्नागिरी), कणकवली कॉलेज (कणकवली), डॉ. जे. बी. नाईक कॉलेज (सावंतवाडी), क्रिएटिव्ह एजुकेशन ट्रस्ट (गोवा) आणि इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट (मडगाव गोवा) या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
परीक्षार्थींना हॉल तिकीट परीक्षा केंद्रांवर परीक्षेपूर्वी एक आठवडा आधी उपलब्ध होतील. वेळापत्रक आणि हॉल तिकिटासंबंधात विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाल  ६६६.८ूेङ्म४.्िरॅ्र३ं’४ल्ल्र५ी१२्र३८.ंू भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एस. एस. चौगुले यांनी केले आहे.

Web Title: Open University's Supplementary Examination from 11th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.