आडवेळवाडीतील बंद रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2015 00:56 IST2015-05-28T00:20:31+5:302015-05-28T00:56:21+5:30

मेढा ग्रामपंचायतीकडून कारवाई : चौघांचा विरोधाचा प्रयत्न हाणून पाडला

Open road closure road | आडवेळवाडीतील बंद रस्ता खुला

आडवेळवाडीतील बंद रस्ता खुला

म्हापण : आडवेळवाडी येथील बंद केलेला रस्ता अखेर वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेढा ग्रामपंचायतीने मंगळवारी सायंकाळी ५ वाजता खुला केला. यावेळी हेमंत कोचरेकर, तुळशीदास राऊळ, राजन राऊळ, बाळा राऊळ या चौघांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या विरोधाला न जुमानता रस्ता पूर्ववत करण्यात आला.
आडवेळवाडी येथील ग्रामस्थांनी निवती बंदर ते आडवेळवाडीपर्यंतच्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा तिसरा टप्पा लोकवर्गणी व श्रमदानाने पूर्ण केला होता; पण काही लोकांनी त्या जमिनीवर आपला हक्क सांगत रस्त्यावर दगडी भिंत उभी करून ५० मीटर रस्ता उखडून टाकला होता. त्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर २५ मे रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, विरोधकांच्या तक्रारीवरून निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक जानकर यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथील ग्रामस्थांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला व ज्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तेव्हा तुम्ही पोलीस ठाण्यात त्या लोकांविरोधात तक्रार करा, त्यानंतर पुढील कारवाई करता येईल, असे सांगितले. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या हेमंत राधाकृष्ण कोचरेकर, तुळशीदास गणपत राऊळ, राजन धोंडी राऊळ व बाळा राऊळ यांच्याविरोधात निवती पोलिसांत रात्री तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

जेसीबीच्या सहायाने बांधकाम हटविले
रस्ता २६ नंबरला येत असल्याने वेंगुर्ला तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्ता
२६ नंबरला येत असल्याने
रस्ता मोकळा करण्यास
सांगितले होते.
गटविकास अधिकाऱ्यांनी हा रस्ता मेढा ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने रस्त्यावरील बांधकाम हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण रद्द केले. ग्रामपंचायतीने मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जेसीबीच्या सहायाने रस्त्यावरील भिंत तोडून रस्ता पूर्वस्थितीत आणला. यावेळी मेढा सरपंच आरती कुडाळकर, माजी सरपंच विजय मेतर, ग्रामपंचायत सदस्या धुरी, ग्रामसेवक हळदणकर व आडवेळवाडी व मेढावाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Open road closure road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.