शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:07 IST

यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मोठा अडथळा दसरा-दिवाळीनंतरच हंगाम वेग घेणार

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.साधारपणे मंत्री समिती १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचा दरवर्षी आग्रह धरते; पण तो प्रत्यक्षात येत नसल्याने यावर्षी तो १५ दिवसांनी पुढे धरण्यात आला आहे. पुणे, नगर, सोलापूर, मराठवाड्यात हा मुहूर्त ठीक आहे; पण कोल्हापूर, सांगली या ऊसपट्ट्यात या मुहूर्ताला कारखान्याची धुराडी पेटूच शकत नाहीत. या काळात परतीचा पाऊस सुरू असतो.

यावर्षी दसरा २५ ऑक्टोबरला आहे, तर दिवाळी १६ नोव्हेंबरला संपते. दसरा झाल्यावरच हंगामाची तयारी सुरू होते. १ नोव्हेंबरपासून मजुरांना आणायचे म्हटले त्यांना आणेपर्यंत दिवाळी सुरू होते. त्यामुळे दसऱ्यानंतर हंगाम सुरू झाला तरी गती घ्यायला दिवाळी संपण्याची वाट तोडणी मजूर पाहतात.उसाचे क्षेत्र वाढलेयंदा अनुकूल हवामानामुळे ऊस पीक जोमदार आले आहे. मुबलक पाण्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर निव्वळ लागण; तर एक लाख हेक्टर हे खोडव्याचे क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० हजार हेक्टरनी उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६० मेट्रिक टन ऊस गाळपास येईल आणि १०० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.हंगाम किमान १३०, तर कमाल १६० दिवसांचायंदा उसाची मुबलक उपलब्धता असल्याने साखर कारखान्यांचा उसाचा दुष्काळ संपणार आहे. हंगाम किमान १३०, तर कमाल १६० ते १८० दिवसही चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी १०० दिवसांचा हंगाम गाठताना कारखान्यांची दमछाक झाली होती. या वर्षी ती कसर भरून निघणार आहे.आंदोलन दरासाठी नव्हे; तर टप्पा टाळण्यासाठीगळीत हंगामाचा सरकारी मुहूर्त निघाला तरी प्रत्यक्ष धुराडी कधी पेटणार हे शेतकरी संघटनेच्याच हातात असते. गेली १७ वर्षे हेच गणित जिल्ह्यात राहिले आहे. एफआरपीच किमान तीन हजार रुपये टनावर दराची उत्सुकता संपली असली तरी ती किती टप्प्यात यावरून मात्र रान पेटणार आहे. दरवर्षी स्वाभिमानी हे रान पेटवत होती; पण यावर्षी स्वाभिमानी सत्तेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे; पण त्यांची जागा घेण्यासाठी विरोधी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनी आतापासून पेरणी सुरू केल्याने आंदोलनाची धग कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरणारा आहे. उसाची मुबलक उपलब्धता ही जमेची बाजू असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एफआरपी भागवण्याइतपत ऐपत तयार करण्यासाठी थकहमीचा आरबीआयकडून तयार झालेला गुंता सरकारने तातडीने सोडवायला हवा. अन्यथा कारखानेच सुरू होऊ शकले नाहीत तर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.- विजय औताडे, माजी कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अभ्यासक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर