शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कागलची जनताच हसन मुश्रीफांचा करेक्ट कार्यक्रम करेल - समरजित घाटगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 18:40 IST

मुश्रीफ व घाटगे यांच्यात टीकाटीपण्णी सुरु झाल्याने कागलचे राजकारण तापले

अनिल पाटील

मुरगूड : हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते मंदिरात ही न शोभणारी वक्तव्ये करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श कागलची बदनामी करीत आहेत. आपण काय बोलतो याचे भान त्यांनी ठेवावे, अन्यथा कागलची जनताच येत्या काळात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.    मुरगुड येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी समरजित घाटगे यांचा ओबीसी आरक्षण, प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वीज बील सवलतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी सत्कार केला. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, एकीकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता तर दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करता. तुमच्या सांगण्यावरून तुमचे बगलबच्चे महिलांच्या बाबतीत अवमानकारक एकेरी वक्तव्ये करतात. आम्ही ही जशास तसे उत्तर देऊ शकतो, परंतु आमच्यावर संस्कार आहेत.कागलचे मतदार निवडणुकीची वाटच पाहत आहेत - मुश्रीफसमरजीत घाटगे यांनी निवडणूक लढवून मुश्रीफांना पराभूत करून आमदार होणार असल्याचे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी सहा निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. आता अडीच वर्षांनी होणारी विधानसभेची निवडणूक सातवी आहे. लोकशाहीमध्ये कोणासही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कागलचे मतदार निवडणुकीची वाटच पाहत असून, ते निवडणुकीत योग्य तो निर्णय घेतील असे म्हटले होते.गेल्या दोन दिवसापासून हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात टीकाटीपण्णी सुरु झाल्याने कागलमधील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीला अवधी असला तरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची ही रंगीत तालीमच सुरु झाली असल्याचे म्हणावे लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ