शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अवघ्या करवीरनगरीत शाहू‘नाद’

By admin | Updated: June 27, 2017 00:54 IST

ढोल-ताशांच्या ठेक्यात उत्साह : चित्ररथ ठरले लक्षवेधी; शहरातील ७८ तालीम संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पावसाची रिपरिप आणि ढोल-ताशांचा ठेका, हलगीचा कडकडाट आणि घुमक्याच्या ठेक्यावर तल्लीन होऊन लेझीम खेळणारे युवक अशा वातावरणात वरुणराजाच्या साक्षीने लोकराजा राजर्षी शाहूराजांची दिमाखदार मिरवणूक सोमवारी कोल्हापूर शहरात झाली. शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीत शाहूराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. या मिरवणुकीत शहरातील सुमारे ७८ तालीम संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मिरवणुकीत वरुणराजाचे आगमन होणार हे निश्चित होते. सायंकाळी येथील मिरजकर तिकटी येथून या मिरवणुकीचा प्रारंभ शाहू छत्रपती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मिरवणुकीला प्रारंभ होताच मुसळधार पाऊस आला; पण या पावसातच या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत राजर्षी शाहूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन केले होते. मिरवणुकीत विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. ‘करवीर नाद’चे ढोेल-ताशा पथक आणि हलगीच्या ठेक्यावर कोगील बुद्रुक येथील जय हनुमान लेझीम मंडळाच्या लहान मुला-मुलींंनी मिरवणूक मार्गावर उपस्थितांचे लक्ष वेधले.राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंची आठवण करून देणारे चित्ररथ सहभागी होते. ही मिरवणूक मिरजकर तिकटी येथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, महापालिका चौक, सीपीआर रुग्णालयामार्गे दसरा चौकात आल्यावर तेथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुन्हा बिंदू चौकमार्गे शिवाजी चौकात रात्री उशिरा पोहोचली. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निमंत्रक बाबा महाडिक, बाबा पार्टे, डॉ. सतीश पाटील, केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. हिंदुराव हुजरे-पाटील, अजयसिंह देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, बबन रानगे, अशोक पोवार, संजय आयरेकर, चंद्रकांत यादव, उदय घोरपडे, नरेंद्र इनामदार, सुरेश जरग, पी. जी. पाटील, उदय घोरपडे, स्वप्निल पार्टे, श्रीकांत भोसले, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज उस्ताद, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जिवंत देखावा मिरवणुकीत राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बग्गीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा साकारला होता. तो मिरवणुकीत लक्षवेधी ठरला होता. याशिवाय पारंपरिक लवाजम्यासह १२ बैलगाड्या, १६ घोडे व छत्रपती ताराराणींचा सजीव देखावाही साकारला होता.मिरवणुकीत शिवाजी पेठेतील झुंजार मर्दानी खेळाच्या आखाडाच्या मावळ्यांनी मर्दानी खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये तलवारबाजी, लाठी-काठी, फरी-गदगा, दांडपट्टा, लिंबू-तलवार यांचा समावेश होता. भर पावसातही तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पूर्ण मिरवणुकीत ओसंडून वाहत होता. मिरवणुकीच्या मार्गावर मुसळधार पावसातही अनेक कार्यकर्त्यांनी लेझीम खेळून उत्साहात भर टाकली.