केशरी रेशनकार्ड नावापुरतेच

By Admin | Updated: February 26, 2015 00:08 IST2015-02-25T23:53:53+5:302015-02-26T00:08:07+5:30

सव्वा लाख कार्डधारकांना धान्य नाही : ५५ टक्केच पात्र; तीन महिन्यांपासून धान्य नाही

Only for cashier ration card | केशरी रेशनकार्ड नावापुरतेच

केशरी रेशनकार्ड नावापुरतेच

प्रवीण देसाई -कोल्हापूर -शासनाने अन्नसुरक्षा योजनेत नसलेल्या केशरी कार्डधारकांपैकी जिल्ह्यातील फक्त ५० टक्के कार्डधारकांनाच सध्याच्या दराप्रमाणे धान्य दिले आहे. उर्वरितांना फक्त नावापुरतेच कार्डवर ठेवल्याचे चित्र आहे; कारण त्यांना अद्याप धान्याचा एक कणही मिळालेला नाही. जिल्ह्णातील २ लाख ८५ हजार ४७ केशरी कार्डधारकांपैकी १ लाख २९ हजार जणांचा यामध्ये समावेश आहे.अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य (अंत्योदय) व प्राधान्य (इतर) असे कार्डधारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. ही योजना सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. यामध्ये या योजनेत पात्र न झालेले; परंतु ज्यांचे उत्पन्न लाखापेक्षा कमी आहे, अशा केशरी कार्डधारकांना सध्याच्या दराप्रमाणे रेशनवर लवकरच धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार हे धान्य दिले गेले; परंतु यासाठी पात्र असलेल्या २ लाख ८५ हजार ४७ जणांपैकी फक्त १ लाख ५५ हजार ४७७ कार्डधारकांनाच आतापर्यंत हे धान्य दिले गेले आहे. शासनाने हाच आकडा पात्रतेसाठी धरला आहे. उर्वरितांना एक कणही धान्य न मिळाल्याचे चित्र आहे. ज्यांना मिळत होते त्यांनाही नोव्हेंबरपासून धान्य मिळालेले नाही. कार्डधारकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यावर, याबाबत पात्र लाभार्थ्यांच्या धान्यासंदर्भात प्रत्येक महिन्याला लेखी कळविले आहे. त्याचबरोबर उर्वरित कार्डधारकांच्या समावेशासंदर्भातही शासनाला विचारणा केली आहे; परंतु कोणतेही उत्तर आले नसल्याचे सांगण्यात आले.अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप सुरळीतपणे धान्यपुरवठा सुरू आहे. २४ लाख १३ हजार ९१५ लाभार्थ्यांना महिन्याला हे धान्य मिळत आहे. यातील प्राधान्य (इतर) कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ व प्राधान्य (अंत्योदय ) कार्डधारकांना प्रतिकार्ड २० किलो गहू व १५ किलो तांदूळ दिले जात आहेत.

अन्नसुरक्षा योजनेतील धान्यपुरवठा सुरळीत

प्राधान्य (इतर) ७०५५ ४७०३ ३ किलो २ किलो २ रुपये ३ रुपये २३५१६१५
प्राधान्य (अंत्योदय) १२४६ ९३४ २० किलो १५ किलो २ रुपये ३ रुपये ६२३००
केशरी कार्डधारक १०२५ ८३८ १० किलो ५ किलो ७.२० रु. ९.६० रु. १,५५,४७७

Web Title: Only for cashier ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.