केवळ २६० कोरोना रुग्ण शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST2020-12-07T04:19:08+5:302020-12-07T04:19:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्ह्यात केवळ २६० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असल्याचे दिलासादायक चित्र रविवारी स्पष्ट ...

Only 260 corona patients remain | केवळ २६० कोरोना रुग्ण शिल्लक

केवळ २६० कोरोना रुग्ण शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यात केवळ २६० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असल्याचे दिलासादायक चित्र रविवारी स्पष्ट झाले. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झालेला नाही.

आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, करवीर, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांत एकही रुग्ण सापडलेला नाही. कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात तर केवळ पाच रुग्ण सापडल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवसभरामध्ये जिल्ह्यात १५८ जणांची तपासणी करण्यात आली असून २६३ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. ८१ जणांची ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आली आहे; तर २६० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरामध्ये २५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चौकट

आतापर्यंत नोंदलेले कोरोना रुग्ण ४९१६०

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण ४७२१३

आतापर्यंतचे मृत्यू १६८७

उपचार सुरू असलेले रुग्ण २६०

Web Title: Only 260 corona patients remain