केवळ १२८ ग्रामपंचायतीत बँकिंग सेवा
By Admin | Updated: May 13, 2015 00:52 IST2015-05-12T23:23:33+5:302015-05-13T00:52:59+5:30
जिल्ह्यातील स्थिती : संगणकीय ग्रामीण महाराष्ट्राचा खेळखंडोबा

केवळ १२८ ग्रामपंचायतीत बँकिंग सेवा
अशोक डोंबाळे -सांगली -केंद्र आणि राज्य शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र करण्याच्या घोषणा देऊन, जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी डिसेंबर २०१४ पर्यंत बँकिंग सेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले होते. प्रत्यक्षात पाच महिन्यांनंतर प्रशासनाने आढावा घेतला असता, केवळ १२८ ग्रामपंचायतींमध्येच बँकिंग सेवा सुरू झाली आहे. उर्वरित ३२४ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरूच नसल्याचे दिसत आहे. संग्राम कक्षाकडील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग सेवेचे कामकाज ठप्प असल्याचे प्रशासनाकडून जुजबी उत्तर मिळत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये बँकिंग सेवा सुरू नाही. यामुळे तेथील ग्रामस्थांना वीजबिल, एलआयसी हप्ता, पैशाची देवाण-घेवाण आदी व्यवहार करता येत नव्हते. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी बँकिंग सेवा देण्यासाठी सहकार्य करावे, अशी भूमिका घेतली होती. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बँकिंग सेवा देण्याचे शासनाने सहा महिन्यांपूर्वी धोरण ठरविले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या.
जिल्ह्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतींपैकी ४५२ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा देणे शक्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबर २०१४ पर्यंत बँकिंग सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडियासह सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु करण्यास अनुमती दिली होती. या ठिकाणी खात्यावर पैसे भरणे आणि काढणे, एलआयसीचा हप्ता भरणे, वीज बिल भरण्यासह सेवा दिल्या जाणार होत्या. आता जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरु झाली आहे. तेथे ३३ हजार ८२१ ग्राहक लाभ घेत आहेत. परंतु, काही राष्ट्रीय बँका आणि संग्रामकडील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ३२४ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
बँकिंग सेवेची सद्यस्थिती
तालुका निवड झालेल्याबँकिंगखातेदार
ग्रामपंचायतीसेवासंख्या
आटपाडी२८४२४८
जत३०१७७५४२
क़महांकाळ३८३२६८
खानापूर४९३३२५८
पलूस३८१२२५५८
मिरज५३१३३९४५
कडेगाव३३१२३८५६
शिराळा३९११२५८९
तासगाव५५२४१६८७
वाळवा८९२९७८९२
एकूण४५२१२८३३८२१
जनतेतून नाराजी
शासन गावात बॅँकिंग सेवा सुरू करून देणार, या आशेवर असणाऱ्या ग्रामीण जनतेची निराशा झाली आहे. याबद्दल जनतेतून नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.