तरूकवाडी येथे उद्या ऑनलाईन कुस्ती मैदानाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST2021-01-10T04:18:29+5:302021-01-10T04:18:29+5:30

शित्तूर-वारुण : गेले वर्षभर झालेले कुस्तीक्षेत्राचे नुकसान भरून निघावे, यासाठी राज्यातील कुस्ती मैदाने पुन्हा चालू होणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने ...

Online wrestling ground to be organized at Tarukwadi tomorrow | तरूकवाडी येथे उद्या ऑनलाईन कुस्ती मैदानाचे आयोजन

तरूकवाडी येथे उद्या ऑनलाईन कुस्ती मैदानाचे आयोजन

शित्तूर-वारुण : गेले वर्षभर झालेले कुस्तीक्षेत्राचे नुकसान भरून निघावे, यासाठी राज्यातील कुस्ती मैदाने पुन्हा चालू होणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने ‘कुस्ती हेच जीवन’ या महासंघाच्यावतीने राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदानाचे आयोजन उद्या (दि. १०) रोजी तरूकवाडी (ता. शाहूवाडी) येथे करण्यात आले असल्याची माहिती शाहूवाडी तालुका ''''कुस्ती हेच जीवन''''चे अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली. रविवारी दुपारी ३.०० वाजता तरूकवाडी येथील दत्तसेवा विद्यालयाच्या पटांगणावर हे मैदान भरेल. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती विकास पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात होणार असून, द्वितीय क्रमांकाची कुस्ती उदय खांडेकर विरुद्ध अंजीर पाटील यांच्यात होणार आहे. या मैदानात २५ पेक्षा जास्त लढती होणार असून, फेसबुक पेज व यू ट्युब चॅनलवर लाईव्ह स्वरूपात कुस्ती दिसणार आहे, अशी माहिती कुस्ती हेच जीवनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक रामदास देसाई, अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली.

Web Title: Online wrestling ground to be organized at Tarukwadi tomorrow