‘सत्यशोधक’च्या खातेदारांसाठी ऑनलाईन व्यवहार -सुलोचना नायकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:05+5:302021-02-05T07:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या खातेदारांना लवकरच ऑनलाईन व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देणार ...

‘सत्यशोधक’च्या खातेदारांसाठी ऑनलाईन व्यवहार -सुलोचना नायकवडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या खातेदारांना लवकरच ऑनलाईन व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा बँकेच्या अध्यक्षा सुलोचना नायकवडे यांनी केली.
बँकेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. सभासद आर. डी. पाटील, सुनील सरनाईक, जे. डी. जाधव, जहांगीर अत्तार आदी सभासदांनी चर्चेत भाग घेतला. सभेत सभासदांच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक शिरीष कणेरकर, जयसिंग माने, राजन भोसले, सुभाष भांबुरे, कमर्शिअल बँकेचे संचालक प्रशांत शिंदे, भाऊसाहेब सावंत, रामराव पवार, अमरसिंह शेळके, सुरेश काळे, गजानन लिंगम, हर्षद शेठ, एस. एस. पाटील, हणमंतराव कदम, विलासराव पाटील, आण्णासाहेब देसाई, धनंजय कदम, महेंद्र शिंदे, रंजना भांबुरे, तेजस्विनी घाेरपडे, प्रकाश पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष दत्ताजीराव इंगवले यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षा सुलोचना नायकवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक उपस्थित होते. (फोटो-०१०२२०२१-कोल-सत्यशोधक बँक)