आजऱ्यातील विद्यावर्धिनी पतसंस्थेची ऑनलाइन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST2021-03-17T04:24:32+5:302021-03-17T04:24:32+5:30

आजऱ्यातील विद्यावर्धिनी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. सभासदांनी सभेस ऑनलाइन सहभाग नोंदविला. १ एप्रिलपासून कर्जावरील व्याजदर ...

Online meeting of Vidyavardhini Patsanstha in Ajara | आजऱ्यातील विद्यावर्धिनी पतसंस्थेची ऑनलाइन सभा

आजऱ्यातील विद्यावर्धिनी पतसंस्थेची ऑनलाइन सभा

आजऱ्यातील विद्यावर्धिनी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. सभासदांनी सभेस ऑनलाइन सहभाग नोंदविला. १ एप्रिलपासून कर्जावरील व्याजदर १०.५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभेत उत्तूर शाखेसाठी स्वमालकीची इमारत किंवा जागा खरेदी करणे, शेअर भांडवल मर्यादा, मयत सभासद कल्याण निधी वाढविणे, मयत सभासदांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त लाभ देणे असे ठराव करण्यात आले.

सभेला अध्यक्ष बळवंत शिंत्रे, उपाध्यक्ष एकनाथ ढवण, अनुजा वाळके, धनाजी चौगले, सुभाष विभुते, सुनील सुतार, चंद्रकांत आजगेकर, शुभांगी पेडणेकर, पांडुरंग शिप्पूरकर यांच्यासह सभासद ऑनलाइन उपस्थित होते. व्यवस्थापक विलास पोवार यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन व आभारप्रदर्शन केले.

-------------------------

फोटो ओळी : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत माहिती देताना संचालक चंद्रकांत आजगेकर. शेजारी सर्व संचालक.

क्रमांक : १६०३२०२१-गड-०२

Web Title: Online meeting of Vidyavardhini Patsanstha in Ajara