निर्मलादेवी ट्रस्टकडून उद्या ऑनलाईन ध्यान साधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:21 IST2021-01-02T04:21:00+5:302021-01-02T04:21:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : श्री माताजी निर्मलादेवी सहज योग ट्रस्ट, राष्ट्रीय सहज योग ट्रस्टच्यावतीने सहज योग सुवर्णजयंती उत्सवनिमित्त ...

निर्मलादेवी ट्रस्टकडून उद्या ऑनलाईन ध्यान साधना
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्री माताजी निर्मलादेवी सहज योग ट्रस्ट, राष्ट्रीय सहज योग ट्रस्टच्यावतीने सहज योग सुवर्णजयंती उत्सवनिमित्त देशभरामध्ये उद्या, रविवारी सकाळी ९ ते रात्री ९ सलग १२ तास १६ भाषांमध्ये ध्यानसाधनेचे आयोजन केल्याची माहिती सहजयोग समितीचे जिल्हा समन्वयक रविकिरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सहजयोगच्या वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होता येणार आहे.
ते म्हणाले, लाॅकडाऊनमध्ये ऑनलाईन ध्यानाच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन ध्यान करून घेणारी सहजयोग ही सर्वांत मोठी संस्था असल्याचा पुरस्कारही मिळाला आहे. सहजयोग ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे. रविवारी १६ भाषेत ध्यान साधनेविषयी माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक सत्र ४५ मिनिटाचे असून हिंदीत सकाळी पावणेदहा ते साडेदहा तर मराठीत सायंकाळी सव्वा पाच ते सहा यावेळेत असणार आहे. ऑनलाईन ध्यानसाधनेच्या कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला रवींद्र बलगुंदे, बाबा कुंभोजकर आदी. उपस्थित होते.
फोटो : निर्मलादेवी या नांवाने आहे.