अत्याळमध्ये बुधवारपासून ऑनलाइन व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:22+5:302021-09-13T04:22:22+5:30
बुधवारी सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंटचे सीईओ प्रा. तौहिद मुजावर (सांगली) यांचे ‘बदलते शिक्षण : अडचणी व उपाय’ ...

अत्याळमध्ये बुधवारपासून ऑनलाइन व्याख्यानमाला
बुधवारी सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंटचे सीईओ प्रा. तौहिद मुजावर (सांगली) यांचे ‘बदलते शिक्षण : अडचणी व उपाय’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि. १६) पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांचे ‘मोबाइल माझी शाळा, पण धोके टाळा’ या विषयावर, शुक्रवारी (दि. १७) समाजभान समूहाचे संकल्पक विश्वास सुतार (कोल्हापूर) यांचे ‘रिकाम्या वेळेचा सदुपयोग’ या विषयावर, शनिवारी (दि. १८) शीलसंवर्धिनी संस्थेचे संस्थापक संपत फडतरे (पुणे) हे ‘अधिक सजग पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतील. ही व्याख्याने ‘अत्याळ गणेशोत्सव’ या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येतील. तसेच यू-ट्यूबव्दारेही ती लाईव्ह केली जाणार आहेत. विद्यार्थी, पालकांनी सहभागी होऊन व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.