ऑनलाईन गंडा, पोलिसांच्या तत्परतेने मिळाले सव्वा दोन लाख परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:15+5:302021-07-14T04:27:15+5:30
कोल्हापूर : ‘ऑनलाईन केलेल्या खरेदीवर कॅशबॅक आली आहे, ती रिफंड करायची आहे’ अशा भूलथापा लावून खरेदीदाराकडून बँक डिटेल्स व ...

ऑनलाईन गंडा, पोलिसांच्या तत्परतेने मिळाले सव्वा दोन लाख परत
कोल्हापूर : ‘ऑनलाईन केलेल्या खरेदीवर कॅशबॅक आली आहे, ती रिफंड करायची आहे’ अशा भूलथापा लावून खरेदीदाराकडून बँक डिटेल्स व ओ.टी.पी. नंबर घेऊन हॅकर्सने सुमारे २ लाख ७५ हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. माहिती मिळताच शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिग्विजय चौगले यांनी तत्परतेने तांत्रिक बाबींचा अवलंब करत संबंधिताचे सव्वादोन लाख रुपये मिळवून दिले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथील ऋषिकेश पार्कमधील सत्ताप्पा पाटील यांनी ऑनलाईनवरुन एक वस्तू मागवली होती. त्या खरेदीवर कॅशबॅक आली आहे, ती रिफंड करायची आहे असा अनोळखी व्यक्तीचा त्यांना मोबाईलवर फोन आला. कॅशबॅकसाठी अनोळखी व्यक्तीने हिंदीमधून बोलून पाटील यांना भूलथापा लावून बँक डिटेल्स व ओ.टी.पी. बाबत माहिती घेतली. पाटील यांनी मोबाईलवरील त्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मोबाईलवरुन माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७५ हजार रुपये कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने शाहुपुरी पोलीस ठाणे गाठले.
शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार दिग्विजय चौगले यांनी तातडीने तक्रारदारांकडून प्रकार जाणून घेतला. पासबुकवर व्यवहार झालेल्या ठिकाणी तत्काळ पत्रव्यवहार केला. नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन व फ्लिपकार्ड पेमेंट यांच्या मदतीने अर्जदाराची रक्कम ज्या खात्यावर जमा झाली, ती खातीच गोठवून रक्कम अबाधित ठेवली. संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करुन पुन्हा अर्जदाराच्या खात्यावर सुमारे सव्वादोन लाख रुपये जमा केले. पोलीस दिग्विजय चौगले यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तक्रारदाराचे नुकसान टळले.
फोटो नं. १३०७२०२१-कोल-दिग्विजय चौगले (पोलीस)
130721\13kol_5_13072021_5.jpg
फोटो नं. १३०७२०२१-कोल-दिग्वीजय चौगले (पोलीस)