प्रादेशिक परिवहनमध्ये आॅनलाईन अपॉर्इंटमेंट

By Admin | Updated: December 2, 2014 00:50 IST2014-12-02T00:38:37+5:302014-12-02T00:50:06+5:30

अंमलबजावणी सुरू : पहिल्या दिवशी गोंधळ

Online Appointments in Regional Transportation | प्रादेशिक परिवहनमध्ये आॅनलाईन अपॉर्इंटमेंट

प्रादेशिक परिवहनमध्ये आॅनलाईन अपॉर्इंटमेंट

कोल्हापूर : राज्याच्या परिवहन विभागाने आज, सोमवारपासून पक्के लायसेन्स काढू इच्छिणाऱ्या नागरिकांना परीक्षापूर्व चाचणीसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेट घेणे बंधनकारक केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठल्याही सूचना फलकावर आजपासून या आदेशासंबंधी काहीच सूचना लिहिली नसल्याने एजंटांसह अनेक नागरिकांना अधिकारी येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. या निर्णयाची अंमलबजावणी जरी सोमवारपासून झाली असली तरी ही पद्धती खऱ्या अर्थाने कार्यान्वित होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून लागू केलेल्या या आॅनलाईन पद्धतीमुळे नागरिकांना आता रांगेत अथवा एजंटांची गरज लागणार नाही. याकरीता केवळ प्रादेशिक परिवहनने दिलेल्या संकेतस्थळावर इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षापूर्व चाचणीसाठी तारीख निश्चिती घ्यावी लागणार आहे. त्यानुसार लायसेन्स काढू इच्छिणाऱ्या निश्चित दिवस मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज (दि. १)पासून जरी केली असली तरी पक्के लायसेन्स काढणाऱ्यांना बुधवार उजडण्याची शक्यता आहे. या पद्धतीत दिवसाला १२० इच्छुकांना लायसेन्स वाटप करण्यात येणार आहे. पक्क्या लायसेन्सकरीता परिवहन विभागाने वेळेचा आराखडा बांधला आहे. त्याप्रमाणे एका तासात दुचाकी व तीन चाकीसाठी प्रत्येकी पाच मिनिटांचा वेळ निश्चित केला आहे. याशिवाय हलके/मध्यम चारचाकी वाहनांकरीता ७ मिनिटे, अवजड वाहनांकरीता १० मिनिटे अशी विभागणी केली आहे. दिवसातील साडेपाच तासांचे नियोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
आजपासून सुरू झालेल्या या आॅनलाईन अपार्इंटमेंटची माहिती इच्छुक नागरिकांना माहीत नसल्याने अनेकांनी सकाळपासून कार्यालयात गर्दी केली होती. अकरा वाजता अधिकारी आल्यानंतर या इच्छुकांना आजपासून आॅनलाईन अपार्इंटमेंट घ्यावी लागणार आहे, हे समजले. याबाबत पक्के लायसेन्स चाचणीच्या ठिकाणी कोणताही बोर्ड नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. ( प्रतिनिधी )

Web Title: Online Appointments in Regional Transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.