शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प

By भीमगोंड देसाई | Updated: August 27, 2024 13:57 IST

आपले सरकार केंद्र अधांतरी : सरकारकडून मुदतवाढ नसल्याचे ऑपरेटरनी केले काम बंद

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : आपले सरकार केंद्र सुरू ठेवण्यासंबंधी शासनाचे स्पष्ट आदेश नसल्याने जिल्ह्यातील सर्व १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार कोलमडला आहे. आपले सरकार केंद्रातील ऑपरेटरनी काम बंद केले आहे. परिणामी ग्रामस्थांना मिळणाऱ्या ऑनलाइन सेवा खंडित झाल्या आहेत. परिणामी सर्व ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचातयींचा ऑनलाइन कारभार ७३५ आपले सरकार केंद्रातून चालत होता. ग्रामपंचायतीमधील या केंद्रातील खासगी ऑपरेटरना सन २०१६ पासून सीएससी-एसपीव्ही कंपनीतर्फे मानधन दिले जात होते. मात्र, या कंपनीचा करार ३० जून २०२४ रोजी संपला. त्यानंतर केंद्र चालवण्याची जबाबदारी शासनाने महाआयटी कंपनीकडे सोपविली. मात्र, महाआयटीने ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्र चालविण्यास नकार दिला. त्यानंतर सरकारने केंद्रासंबंधीचे स्पष्ट असे आदेश दिले नाहीत. केंद्रातील ऑपरेटरचा, बारा तालुक्यांतील व्यवस्थापक आणि एक जिल्हा व्यवस्थापकाच्या पगारासंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून या सर्वांनी काम बंद केले आहे.जन्म, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, नमुना १ ते ३३ प्रमाणपत्रे, पीएम विश्ववकर्म, लाडकी बहीण नोंदणी, गती शक्ती, कर्मचारी मानधन, केंद्र चालक मानधन, ई-ग्रामस्वराज्य अशा ऑनलाइन सेवा बंद झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या गतिमान कारभाराला ब्रेक लागला आहे. ऑफलाइनमुळे कारभारात शिथिलता आली आहे.

सरपंच, उपसरपंचआपले सरकार केंद्र बंद असल्याने सरपंच, उपसरपंचांचे मानधन दोन महिन्यांचे मिळालेले नाही. त्यांनी आमदारांकडे तक्रारी केल्यानंतर ऑफलाइन मानधन काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, इतर बंद असलेल्या सेवेसंबंधी शासकीय पातळीवर ठोस अशा हालचाली होताना दिसत नाहीत.

लाडकी बहिणीचा ऑनलाइन अर्ज नाही..ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्रातील ऑपरेटरनीच काम बंद केल्याने लाडकी बहिणी योजनेतून ऑनलाइन अर्ज भरणे बंद आहे. ३१ ऑगस्टअखेर शेवटची मुदत आहे. अशातच केंद्रातील ऑनलाइन कामकाज बंद असल्याने लाडक्या बहिणीलाही ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

ऑपरेटर बेरोजगारकंपनीकडून केंद्रात काम करणाऱ्या ऑपरेटरना सात हजार रुपये मानधन मिळत होते. मात्र, कंपनीचा शासनाशी असलेला करार संपल्याने ऑपरेटरांची नोकरी गेली आहे. ७३५ ऑपरेटर बेरोजगार झाले आहेत.

जिल्ह्यातील केंद्रे ?करवीर : १०८चंदगड : ७७पन्हाळा : ७३शाहूवाडी : ७१कागल : ७०राधानगरी : ६५भुदरगड : ६४हातकणंगले : ५४गडहिंग्लज : ५२शिरोळ : ५१आजरा : ३४गगनबावडा : १६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत