शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतराला वर्षाची मुदतवाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील किती प्रकरणे प्रलंबित.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:34 IST

३१ डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू राहणार

कोल्हापूर : शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला राज्य शासनाने वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील ३००च्या वर खातेदारांना फायदा होणार आहे. यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे.कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शासनाने यापूर्वी मार्चअखेरपर्यंत अर्ज आलेल्यांसाठी जमीन वर्ग १ करण्यासाठी नोव्हेंबरअखेरपर्यंत रक्कम भरण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार जेवढ्या नागरिकांनी योग्य कागदपत्रांनिशी अर्ज दिला त्या सर्वांना योजनेचा लाभ मिळाला. पण, याची नेमकी संख्या जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागाकडे नाही.

८६ प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबितजिल्ह्यातील ज्या नागरिकांनी मार्चअखेरपर्यंत जमीन वर्ग एक करण्यासाठीचे अर्ज दिले आहेत, त्यांचे अर्ज नोव्हेंबरपर्यंत निर्गत करण्यात आले आहेत. ८६ प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत. मुदतीत रक्कम भरण्याविषयी ज्यांना कळविण्यात आले होते, तरीही त्यांनी भरलेले नाहीत अशा लोकांना त्यांनी रक्कम न भरल्याने लाभ देता येणार नाही, असे कळविले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार