शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

एकमेकाकडे बघण्यातून महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:26 IST

शिवाजी पेठेतील एका प्रसिद्ध महाविद्यालयासमोर एकमेकाकडे बघण्याच्या कारणातून युवकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगड भिरकावल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, जुनाराजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेताच दोन्ही बाजूच्या युवकांनी तेथून धूम ठोकली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या हाणामारीच्या प्रकाराने परिसरात तणाव पसरला.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडाशिवाजी पेठेतील घटना : एकमेकाकडे बघण्याचे कारण

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका प्रसिद्ध महाविद्यालयासमोर एकमेकाकडे बघण्याच्या कारणातून युवकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगड भिरकावल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, जुनाराजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेताच दोन्ही बाजूच्या युवकांनी तेथून धूम ठोकली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या हाणामारीच्या प्रकाराने परिसरात तणाव पसरला.अधिक माहिती अशी, शिवाजी पेठ येथील एका महाविद्यालयात सोमवारी विद्यार्थ्यांची गर्दी होती. सकाळी अकराच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर सर्व युवक महाविद्यालयासमोर उभे होते. त्याठिकाणी दोन गटांत एकमेकाकडे बघण्यावरुन जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर युवक भिडल्याने गोंधळ उडाला.

परिसरातील रस्त्यावरील दगड एकमेकांच्या दिशेने भिरकावले गेले. या प्रकाराची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना समजताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही बाजूच्या युवकांनी दिसेल त्या रस्त्याने पळ काढला.

पोलीस गेल्यानंतर पुन्हा या परिसरात युवक जमल्याने तणाव पसरला. या परिसरात रोज वर्चस्ववाद, वैयक्तिक हेव्याद्याव्यातून हाणामारीचे प्रकार घडत असतात. याबाबत मात्र जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर