शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींना मिळाला ४८ कोटींचा निधी, गावांचा होणार विकास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:19 IST

२६ जिल्हा परिषदांना निधी नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील १०१५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील पंधराव्या वित्त आयोगातील बंधित निधीचा दुसरा हप्ता अदा करण्यात आला आहे. ही रक्कम ४७ कोटी ७२ लाख दहा हजार रुपये असून ती ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.दोनच दिवसांपूर्वी याबाबत ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढला आहे. एकूण राज्याला १ हजार ८३ कोटी रुपये इतका निधी अदा करण्यात आला आहे. यातील प्रत्येकी १० टक्के रक्कम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी राखीव आहे, तर उर्वरित ८० टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.जिल्ह्यात जरी १०२५ ग्रामपंचायती असल्या तरी दहा ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्यामुळे या ग्रामपंचायतींचा निधी अदा करण्यात आलेला नाही. या निधीतून स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती आणि पेयजल योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यासाठी या निधीतून ५० टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. जर यातील एका बाबीची आधी पूर्तता झाली असेल तर उर्वरित निधी दुसऱ्या बाबीसाठी वापरता येणार आहे.

२६ जिल्हा परिषदांना निधी नाहीराज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि ६३५ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा यातून अदा करण्यात आलेला नाही. या सर्व संस्थांना गेल्या वर्षभरापासून निधी मिळालेला नाही. संस्थेवर प्रशासक असल्याचे कारण त्यासाठी सांगण्यात येते.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींना दिलेला निधीतालुका - ग्रामपंचायत - रक्कमकरवीर - ११२- ८ कोटी १८ लाखगडहिंग्लज -८८ - ३ कोटी ३४ लाखराधानगरी - ९७ - ३ कोटी ४७ लाखचंदगड - १०८  - ३ कोटी ७९ लाखपन्हाळा - ११०  - ४ कोटी ४६ लाखआजरा - ७३ - १ कोटी ७८ लाखभुदरगड - ९७  - २ कोटी ६० लाखगगनबावडा - २९  -  ६२ लाख ५२ हजारशाहूवाडी - १०६ - ३ कोटी १५ लाखशिरोळ - ५२ - ५ कोटी ९९ लाखकागल - ८३ - ४ कोटी २० लाखहातकणंगले - ६० -  ७ कोटी ८७ लाखएकूण - १०१५  - ४७ कोटी ७२ लाख १० हजार रुपये 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत