‘आयटीआय’मध्ये एक हजार अर्ज

By Admin | Updated: July 3, 2016 00:45 IST2016-07-03T00:45:38+5:302016-07-03T00:45:38+5:30

विद्यार्थ्यांची गर्दी : तंत्रनिकेतनमध्येही झुंबड

One thousand applications in 'ITI' | ‘आयटीआय’मध्ये एक हजार अर्ज

‘आयटीआय’मध्ये एक हजार अर्ज

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांसाठी शनिवारअखेर एक हजार जणांनी अर्ज दाखल केले. शासकीय तंत्रनिकेतनमधून प्रथम वर्ष पदविकेसाठी ६८६, तर थेट द्वितीय वर्षासाठी २७१ अर्जांची प्रवेशनिश्चिती झाली.
‘आयटीआय’मध्ये दिवसाअखेर ३०० अर्जांची भर पडली असून आता एकूण एक हजार अर्जांची प्रवेशनिश्चिती झाली आहे. आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जुलैपर्यंत आहे. अर्ज निश्चितीकरिता ‘आयटीआय’च्या सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे अर्ज निश्चितीकरणाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १२७२ अर्जांची विक्री
शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रातून शनिवारअखेर प्रथम वर्ष पदविकेसाठी खुल्या व आरक्षित प्रवर्गातील ९७४ अर्जांची, तर थेट द्वितीय वर्षासाठी २९८ अर्जांची विक्री झाली आहे. यातील प्रथम वर्ष पदविकेसाठी ६८९ जणांच्या, तसेच द्वितीय वर्षासाठी २१२ जणांच्या अर्जांची निश्चिती केली आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत शनिवारअखेरपर्यंत होती. अर्जांच्या निश्चितीकरिता दिवसभर विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन सुविधा केंद्रात गर्दी केली होती.

Web Title: One thousand applications in 'ITI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.