शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:53 IST

परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा

कोल्हापूर : वाहतूक कोंडीतील भांडणात हस्तक्षेप करीत माझी रिक्षा तेवढी येथून घेऊन जातो, असे सांगताना फळविक्रेता अरबाज फयाज बागवान (वय २७, रा. रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, सध्या रा. फायर स्टेशनजवळ, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्यावर एडका, कोयत्याने खुनी हल्ला झाला. याप्रकरणी अक्षय आनंदा ओतारी ( वय २६, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खांडसरी फाटा येथील हॉलसमोर ही घटना घडली.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी अरबाज पत्नीसोबत बालिंगा येथे मित्राच्या घरी जेवणासाठी रिक्षातून जात होते. त्यावेळी खांडसरी फाट्यावर त्यांच्या रिक्षासमोर वाहतूक कोंडी झाली होती. तेथे आरोपी अक्षय याचे भांडण सुरू होते. त्यावेळी रिक्षातील अरबाज हे अक्षयला माझी रिक्षा येथून घेऊन जातो, असे सांगितले. यावर अक्षय याने अरबाजला अर्वाच्च शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने कमरेत खोवलेला एडका, कोयत्याने अरबाज बागवान यांच्या तोंडावर, डोक्यावर, गळ्यावर, पाठीत मारले.याची फिर्याद जखमी अरबाज बागवान यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणात घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी भेट देऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केले. गंभीर जखमी अरबाज यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे.परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हाखानसरी फाट्यावरील खुनी हल्ला प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. आनंद मुकुंद ओतारी (वय ५३, रा. बालिंगा, ता. करवीर) यांच्या फिर्यादीवरून आरबाज बागवान याच्याविरोधात शुक्रवारी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा मुलगा अक्षयवर आरबाज याने चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Argument in traffic jam leads to deadly attack in Kolhapur

Web Summary : A fruit vendor in Kolhapur was brutally attacked after intervening in a traffic dispute. Akshay Otari has been charged. A counter-complaint alleges the vendor attacked Akshay with a knife. The vendor is seriously injured.