शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
4
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
5
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
6
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
7
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
8
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
9
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
10
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
11
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
12
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
13
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
14
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
15
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
16
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
17
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
18
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
19
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
20
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा

कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात, वाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:14 AM

कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्री सव्वा दोन वाजता ट्रक आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक सागर सुधाकर परब याचा मृत्यू झाला, असून १९ जण जखमी झाले आहेत. 

ठळक मुद्देकोल्हापूरात शिवशाही बसला अपघातवाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

किणी/कोल्हापूर - कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्री सव्वा दोन वाजता ट्रक आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक सागर सुधाकर परब याचा मृत्यू झाला, असून १९ जण जखमी झाले आहेत. 

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सावंतवाडीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने पाठीमागून ट्रकला धडक दिली. 

सागर सुधाकर परब

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता हातकणंगले) येथील टोल नाक्यांजवळ थाबंलेल्या कंटेनरला पुणे सावंतवाडी शिवशाही बसने पाठीमागून  जोरदार धडक मारल्याने वाहक सागर सुधाकर परब ( वय ३०, रा. कालेली, ता कुडाळ, जिल्हा सिधुदुर्ग ) याचा  मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी  झाले असून हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास झाला आहे. जखमींना कोल्हापूर  सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सागर परब हा सावंतवाडी आगाराचा कंडक्टर होता.  याबाबत सावंतवाडी एसटी आगाराचे व्यवस्थापक शकील सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. सागर याचे बालपण सावंतवाडी गेले होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी मिळताच सावंतवाडीत शोककळा पसरली आहे. सावंत हे मालवण येथील  सामाजिक कार्यकर्त्या सौ.  शिल्पा खोत यांचे बंधू आहेत तर सिंधूदुर्ग पोलिसात निवृत्त झालेल्या सुधाकर परब यांचे पुत्र आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावरील किणी येथे टोल नाक्याजवळ महामार्गाच्या कडेला थाबंलेल्या (क्रमांक एच आर ८९ बी १६०३  ) कंटेनरला  रात्री दहा वाजता पुण्याहुन कोल्हापूर मार्गे सावंतवाडीला भरधाव वेगाने जात असणारी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या  शिवशाही ( क्रमांक एम एच .वाय .४७१६ ) बसने  पाठीमागील बाजूने जोरदार धडक मारली. धडक जोराची असल्याने थाबंलेला कंटेनर काही अंतरावर जावून महामार्गाच्या कडेला असणाऱ्या नाल्यात जाऊन ऊलटला  तर शिवशाही बसच्या पुढिल बाजूच्या चक्काचूर झाला आहे.

कंटेनरच्या धडकेत मोठा आवाज झाल्याने बस मधील प्रवाशी भयभीत होऊन आरडाओरडा करु लागले. या आवाजाने टोल नाक्यावरील कर्मचारी  व परिसरातील टपरीधारक, प्रवाशांनी आपघात स्थळी धाव घेतली, बसच्या पुढील बाजूला धडक बसल्याने दरवाजा खराब झाल्याने उघडता येत नव्हता , त्यामुळे सपुर्ण प्रवासी अडकून पडले होते. खिडक्याच्या  काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.  

जखमी सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल

मिलिंद मारुती पंडे (वय ३३ रा.वाघापुर, ता. भुदरगड), शिवराज बसवराज तुकबतमठ (वय ३१) सविता बसवराज तुकबतमठ ( वय ३१), चंदन हितेश देवनाथ (वय ३६), अरुण गुरुगोंडा पाटील (वय ४२,सर्व रा. गडहिंग्लज), पांडुरंग लक्ष्मण जाधव(वय ६२ ). सुनील नारायण शिंदे (वय ४५, दोघेही रा आजरा),  सुरेश सखाराम आरळेकर (वय ८०, नागाळा पार्क, कोल्हापूर), रोहित अनिल कुंभार (वय २०, बापट कॅम्प, कोल्हापूर), टोपन्ना मारुती नाईक ( वय २९  तुरकेवडी, ता.चंदगड), अस्मिता अरविंद मुननकर (वय ५१), अरविंद दत्तात्रय मूननकर (वय ५२, दोघेही रा. कोलगाव, ता.सावंतवाडी), विवेक विकास कालेकर (वय २६, पिंपरी चिंचवड), इरफान इस्माईल सय्यद (वय २८, लाईन बाजार, कोल्हापूर), सीताराम पांडुरंग गावडे (वय ६७, विश्रांतवाडी, पुणे), सुनील तुकाराम पवार (वय ३२, आजरा), महंमद रियाज बागवान (वय २६, चिकोडी), रोहित शांताराम सावंत (वय २२, रा.चौकुळ , माळवाडी, ता. सावंतवाडी) हे गंभीर जखमी झााले. जखमींना कोल्हापूर  सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या  सर्वांना १०८ व हायवे हेल्पलाईनच्या  रुग्णवाहिकेतुन कोल्हापूर येथे सी.पी.आर मध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघाताबाबत बसमधील प्रवाशी रोहित शांताराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक महंमद बागवान( रा. चिकोडी)  याच्याविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीAccidentअपघात