परवाना नूतनीकरणासाठी एक महिन्याची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:29+5:302021-07-01T04:17:29+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग व शासनाने घालून दिलेले निर्बंध यामुळे शहरातील व्यावसायिकांना आपले परवाने नूतनीकरण करता आलेले नाहीत. त्यामुळे ...

One month extension for license renewal | परवाना नूतनीकरणासाठी एक महिन्याची मुदतवाढ

परवाना नूतनीकरणासाठी एक महिन्याची मुदतवाढ

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग व शासनाने घालून दिलेले निर्बंध यामुळे शहरातील व्यावसायिकांना आपले परवाने नूतनीकरण करता आलेले नाहीत. त्यामुळे व्यापारी असोसिएशनने नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी परवाना नूतनीकरणासाठी ३१ जुलैअखेर मुदतवाढ दिलेली आहे.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल ते ३० जूनअखेर परवाने नूतनीकरण करण्याबाबत महापालिकेने मुदत दिली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत. त्यामुळे अद्यापही बहुतांशी व्यापाऱ्यांचे परवाने नूतनीकरण झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी परवाने नूतनीकरण करण्याकरिता दि. ३१ जुलैअखेर विना लेट फी परवाना नूतनीकरणासाठी मुदतवाढ दिलेली आहे.

परवाना नूतनीकरणासाठी ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहे. ऑनलाईन परवानाधारकांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळास (www.kolhapurcorporation.gov.in) भेट देऊन परवाने नूतनीकरण करावे. तसेच जे व्यवसायांना अग्निशमन सुरक्षितेच्या दृष्टीने बी फार्म सादर करणे आवश्यक आहे, त्यांनी सदरचा फॉर्म सोबत सादर करून परवाना नूतनीकरण करण्याचे आहे. परवाना फी भरणेची वेळ सुटीचे दिवसाखेरीज सकाळी १० ते १.३० व दुपारी २ ते ३.३० पर्यंत राहील. फी नागरी सुविधा केंद्र (शिवाजी मार्केट) तळमजला या ठिकाणी भरून घेतली जाईल. शहरातील सर्व परवानाधारकांनी याची नोंद घेऊन आपला परवाना विहित मुदतीत भरून सहकार्य करावे, असे आवाहन परवाना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: One month extension for license renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.