शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना महिन्याची मुदतवाढ, जिल्ह्यात ४७० कर्मचारी पात्र
By संदीप आडनाईक | Updated: May 30, 2023 22:56 IST2023-05-30T22:55:51+5:302023-05-30T22:56:06+5:30
कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील ४७० कर्मचारी या बदल्यांना पात्र आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना महिन्याची मुदतवाढ, जिल्ह्यात ४७० कर्मचारी पात्र
कोल्हापूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना राज्य सरकारने मंगळवारी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील ४७० कर्मचारी या बदल्यांना पात्र आहेत.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.
मात्र सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील दि. ३१ मे २०२३ पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. ३० जून २०२३ पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचा शासन निर्णय मंगळवारी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. हा शासन निर्णय राज्य सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.