शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एक लाख १६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:24 IST

Muncipal Corporation Health Kolhapur- राज्य शासनाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन व मॉप अप दिन राबविण्याच्या सूचना दिल्या असून, त्याअनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एक लाख १६ हजार ३० इतक्या मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितली.

ठळक मुद्देएक लाख १६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या देणार महापालिका दि. ८ मार्चपर्यत मोहीम राबविणार : बलकवडे

कोल्हापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन व मॉप अप दिन राबविण्याच्या सूचना दिल्या असून, त्याअनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एक लाख १६ हजार ३० इतक्या मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितली.अंगणवाडीत जाणारे व इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या पटावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शाळेत न जाणाऱी सर्व मुले व मुली यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे.

कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरतो. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ती अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो. म्हणून भावी पिढी सुदृढ व सशक्त होण्याकरिता जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे.मोहीम महापालिकेच्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सोमवापासून सुरू झाली. शहरातील २१४ आशा स्वयंसेविका व २०० अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत अंगणवाडीतील व शाळेत न जाणारे १ ते १९ वर्षातील मुलांना घराघरात जाऊन जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना जंतनाशक गोळी देऊन कृमीदोष व कुपोषणापासून संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्यkolhapurकोल्हापूर