बोरपाडळे घाटात चारचाकी पेटून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST2021-09-24T04:29:27+5:302021-09-24T04:29:27+5:30

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मी, अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय ३२, रा. पिंपळगाव-झुलपेवाडी, ता.आजरा) हे नावली (ता. पन्हाळा) ...

One killed in Borpadle ghat | बोरपाडळे घाटात चारचाकी पेटून एकाचा मृत्यू

बोरपाडळे घाटात चारचाकी पेटून एकाचा मृत्यू

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मी, अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय ३२, रा. पिंपळगाव-झुलपेवाडी, ता.आजरा) हे नावली (ता. पन्हाळा) येथील चालवण्यास घेतलेल्या धाब्याकडे निघाले होते. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात त्यांच्या कारने (क्र.एमएच १४ बीसी ४२३०) अचानक पेट घेतला. आगीने लगेच रौद्ररूप घेतल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे.

गाडी पेटल्यानंतर गाडी रस्त्याच्या बाजूला गेल्याचे दिसत होते. तरीही सुमारे तासभर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. तसेच परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचे प्रयत्न केला. घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, नरेंद्र पाटील, बी.डी. माने, हिम्मत कुंभार आदींनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: One killed in Borpadle ghat