कदमवाडीत मारहाणीत एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST2021-02-19T04:14:47+5:302021-02-19T04:14:47+5:30

कोल्हापूर : सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून कदमवाडीत दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. याबाबतची फिर्याद शंकर अरुण शिंदे ...

One injured in Kadamwadi attack | कदमवाडीत मारहाणीत एक जण जखमी

कदमवाडीत मारहाणीत एक जण जखमी

कोल्हापूर : सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून कदमवाडीत दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. याबाबतची फिर्याद शंकर अरुण शिंदे (वय २८, मूळ रा. बिळाशी, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. अयोध्या मित्रमंडळ चौक, कदमवाडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत बुधवारी सायंकाळी दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये अधिक ऊर्फ पप्पा डाळके, संदीप ऊर्फ विक्रम पाटील, दोघे रा. कदमवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि. १६) रात्री पावणेबारा वाजता संशयित डाळके यांनी फिर्यादी शिंदे यांच्या अयोध्या चौकातील दुकानात येऊन सिगारेट मागितली. त्यांनी ती नाही म्हटल्यानंतर संशयिताने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतोस, अशी फिर्यादीने विचारणा केली असता संशयिताने पाटील यास फोन करून बोलावून घेतले. यादरम्यान संशयित पाटील याने थेट आल्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान संशयिताने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोन संशयितांविरुद्ध फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

Web Title: One injured in Kadamwadi attack