शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीअखेरीस शंभर ई-बसेस कोल्हापुरात, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 14:24 IST

तत्पूर्वी पायाभूत सुविधांची निर्मिती करणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागास (केएमटी) मंजूर झालेल्या १०० ई-बसेस फेब्रुवारीअखेरीस कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्नशील असून तत्पूर्वी पायाभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.ई-बसेससाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी आणि पूर्ततेसाठी खासदार महाडिक यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्युतीकरणाचा २६ कोटींचा आणि पायाभूत सुविधांसाठी १२ कोटींचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविला आहे, त्याचा आपण पाठपुरावा करू, असे खासदार महाडिक यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात कोल्हापूरवासीयांना १०० ई-बसेसची गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.केएमटीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे लक्षात घेऊन आणि नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी यासाठी खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारकडे कोल्हापूर शहरासाठी १०० ई-बसेसची मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाली.नव्या ई-बसेससाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ई -बसेसच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती स्थान, पार्किंग व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे. पुईखडी ते केएमटी वर्कशॉप या साडेआठ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ३३ केव्ही क्षमतेची स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकणे गरजेचे आहे. तसेच केएमटी वर्कशॉपमध्ये ३५ चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. अशा विद्युतीकरणाच्या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी १२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या दोन्ही खर्चांचे प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.१०० ई-बसेसचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रसंगी जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासन यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी चर्चेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, केएमटीचे सहायक अभियंता सुरेश पाटील, अधीक्षक पी. एन. गुरव, विद्युत विभागाचे सहायक अभियंता अमित दळवी, दीपक पाटील, नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, वैभव माने यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक