सातवे येथे एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:57+5:302021-09-11T04:24:57+5:30
सातवे (ता. पन्हाळा येथील ) अर्जुन बाबूराव पाटील (वय ५०) यांचा घरात मृतदेह आढळून आला. अर्जुन हे घरी एकटेच ...

सातवे येथे एकाचा मृत्यू
सातवे (ता. पन्हाळा येथील )
अर्जुन बाबूराव पाटील (वय ५०) यांचा घरात मृतदेह आढळून आला. अर्जुन हे घरी एकटेच राहात होते. शुक्रवार दि. १० रोजी सकाळी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरावरील कौले काढून इतरांनी प्रवेश करून दार उघडले. यावेळी अर्जुन हे मृत आढळून आले. पोलीस पाटील डॉ. स्वाती निकम यांनी कोडोली पोलिसात वर्दी दिली आहे.
दहा वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी एक मुलगा व मुलीचा सांभाळ स्वत: केला होता. चार महिन्यापूर्वीच मुलीचे लग्न झाल्याने अर्जुन हे एकटे राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. हवालदार विश्वास चिले तपास करीत आहेत.