शाहूवाडी तालुक्यात म्युकरमायकोसिसमुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:05+5:302021-06-16T04:34:05+5:30

प्रदीप माळी हा कोतोली गावचा रहिवासी असून तो गावात शेती करीत होता . दीड महिन्यापूर्वी प्रदीप याला ताप आला ...

One died due to mucorrhoea in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यात म्युकरमायकोसिसमुळे एकाचा मृत्यू

शाहूवाडी तालुक्यात म्युकरमायकोसिसमुळे एकाचा मृत्यू

प्रदीप माळी हा कोतोली गावचा रहिवासी असून तो गावात शेती करीत होता . दीड महिन्यापूर्वी प्रदीप याला ताप आला होता . त्यातच कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती . त्यातच त्याची दाढ दुःखू लागल्याने त्याला कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते . त्याची रक्ताची तपासणी केल्यावर त्याला म्युकरमायकोसिसच्या आजाराचे निधान झाले . त्याला कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . तेथे म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन मिळाले नाही . त्यातच त्याच्या मेंदूत इन्फेक्शन झाले होते .त्यामुळे त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Web Title: One died due to mucorrhoea in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.