राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

By Admin | Updated: August 5, 2014 23:42 IST2014-08-05T22:13:50+5:302014-08-05T23:42:08+5:30

राजेसाहेब खेमसावंत : लोकाग्रहास्तव निर्णय

One day in the month of Rajghrane, give it to the public | राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

सावंतवाडी : श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच शिवरामराजे भोसले हे जसे जनतेला भेटून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत होते तसे आता राजेसाहेब खेमसावंत भोसले करणार आहेत. लवकरच ते महिन्यातील एक दिवस जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी घोषणा त्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शिवराम दळवी उपस्थित होते.श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजे भोसले हे प्रजेमध्ये जात. त्यांची सुख दु:खे जाणून घेत असत. राजे येणार म्हटल्यावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह असे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राजे गेले की, त्यांची मोठी उठबस होत असे. प्रत्येकजण आपला राजा आला, असे म्हणत त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत असे. मात्र, गेली कित्येक वर्षे जनता व राजघराणे यांच्यातील संपर्क थोडासा कमी झाला आहे.आजही अनेक भाविक पाटेकर देवस्थानात येत असतात. त्यावेळी ते पाटेकर मंदिरात जाऊन आल्यावर राणीसाहेब सत्वशीलादेवी भोसले यांच्याकडे नतमस्तक होतात. हजारो ग्रामस्थ राजवाड्यात येतात. त्याशिवाय बाहेरील पर्यटक राजवाड्यातील गंजिफासारखी कला पाहण्यास आले की, राजघराण्यापुढे आवर्जून नतस्मतक होतात. पण आता माजी आमदार शिवराम दळवी तसेच अनेक नागरिकांच्या आग्रहास्तव राजे खेमसावंत भोसले हे लोकांना भेटणार आहेत. याबाबतचा दिवस ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजे खेमसावंत हे पुन्हा एकदा आपल्या प्रजेत जाणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये जायला आवडेल. आम्ही लोकांसाठी असल्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेऊ. २५ आॅगस्टच्या पाटेकर मंदिरातील कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात अनेकजण भेटतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सावंतवाडी संस्थानाने विशेषत: बापूसाहेब महाराजांनी १२ बलुतेदारांना संस्थानमध्ये मानाचे स्थान देऊन उभ्या महाराष्ट्रात नवा इतिहास घडवला आहे. त्यांचे कार्य श्रीमंत शिवरामराजे यांनीही सुरू ठेऊन इतिहास घडवून आणला. त्यांचे हे कार्य खेमसावंत भोसले सुरू ठेवणार आहेत. संस्थानच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज घटकांना शासनाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी आरक्षण जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे शिवराम दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: One day in the month of Rajghrane, give it to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.