एक कोटीचे दागिने सापडले
By Admin | Updated: July 17, 2014 00:52 IST2014-07-17T00:52:40+5:302014-07-17T00:52:59+5:30
सिंधुदुर्गातील घटना : कागदपत्रांची तपासणी

एक कोटीचे दागिने सापडले
वैभववाडी : करूळ तपासणी नाक्यावर काल, मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास खासगी आरामबसमध्ये सुमारे एक कोटी किमतीचे साडेचार किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी पकडले. मुद्देमालासंबंधीची कागदपत्रे न सापडल्याने मुंबईतील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ‘मणप्पुरम फायनान्स’च्या अधिकाऱ्यांनी सोने व्यवहाराचे कागद सादर केल्यानंतर सायंकाळी मुद्देमाल ताब्यात देऊन त्या दोघांना सोडून दिले.