नाना पाटील नगरात एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:00+5:302021-06-10T04:18:00+5:30

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात आमच्याविरोधात तक्रार का दिलीस असा जाब विचारुन दोघा तरुणांनी एकास लोखंडी टोकदार वस्तूने व लाथाबुक्क्यांनी ...

One beaten in Nana Patil Nagar | नाना पाटील नगरात एकास मारहाण

नाना पाटील नगरात एकास मारहाण

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात आमच्याविरोधात तक्रार का दिलीस असा जाब विचारुन दोघा तरुणांनी एकास लोखंडी टोकदार वस्तूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना फुलेवाडी रिंगरोडवर नाना पाटील नगर चौकात घडली. विकास बाबुराव पांगे (वय ३३ रा. दत्त कॉलनी, रिंगरोड फुलेवाडी) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास पांगे यांना रस्त्यात अडवून तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का दिलीस असा जाब विचारुन तानाजी कोळपाटे (वय २५) प्रकाश साळोखे (३०, दोघेही रा. रिंगरोड, फुलेवाडी) यांनी जाब विचारला, तसेच दोघांनीही पांगे याला शिवीगाळ करून टोकदार लोखंडी वस्तूने मारून जखमी केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात कोळपाटे व साळोखे या दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One beaten in Nana Patil Nagar