कोरोचीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST2021-04-02T04:24:53+5:302021-04-02T04:24:53+5:30

शहापूर : कोरोची (ता.हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून एकास लाकडी बॅटनपट्टीने मारहाण करून जखमी केले. संजय बापूसाहेब वडेकर (वय ४५, ...

One beaten for minor reasons in Korochit | कोरोचीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण

कोरोचीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण

शहापूर : कोरोची (ता.हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून एकास लाकडी बॅटनपट्टीने मारहाण करून जखमी केले. संजय बापूसाहेब वडेकर (वय ४५, रा. लोकमान्यनगर) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला.

अशोक अंगडी, प्रकाश अंगडी व संगीता अंगडी (तिघे रा. कोरोची) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, अशोक याची मुलगी मीनाक्षी हिने घरातील खरकटे पाणी गटारीमध्ये टाकत असताना ते पाणी संजय यांच्या तुळशी कट्ट्यावर उडाले. याबाबत त्यांनी मीनाक्षीला जाब विचारला असता संगीता हिने संजय यांना शिवीगाळ केली व संशयित अशोक याने लाकडी बॅटनपट्टीने, तर प्रकाश याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

Web Title: One beaten for minor reasons in Korochit